मंत्रा प्रॉपर्टीजकडून ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी ६७५ युनिट्सच्या विक्रीचा रेकॉर्ड

पुणे, 4 नोव्हेंबर २०२०: पुणे स्थित ख्यातनाम विकासक आणि लाइफस्टाइल घरांचे निर्माते असलेल्या मंत्रा प्रॉपर्टीजने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत ६७५ युनिट्सची सर्वोच्च विक्री करून अधिक उलाढाल केली आहे. या महामारीच्या आजारादरम्यान ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मागील काही काळापासून उतरणीला लागलेल्या रिअल्टी क्षेत्रात या कंपनीने सकारात्मक प्रभाव टाकला आहे.

कोविड-१९ मुळे उडालेला गोंधळ आणि एकूणच तणाव असताना मंत्रा प्रॉपर्टीजने आपल्या मंत्रा घर बनाये धनी, ८ टक्‍के की आमदनी अशा नावीन्यपूर्ण मोहिमांद्वारे एक यशोगाथा निर्माण केली आहे व एरवी उतरणीला लागलेल्या बाजाराला न्यू नॉर्मलमुळे आलेला बदल अंगीकारून संधीत रूपांतरित केले आहे आणि मालमत्ता विक्रीसाठी मार्ग खुला केला आहे. मोहिमेच्या पहिल्या दोन महिन्यांतच ५०० युनिट्स विकले गेले आहेत आणि त्यामुळे या विक्रीला योग्य प्रकारे फायदा मिळाला आहे. ऑक्टोबर २०२० या महिन्यात वाढीचा प्रवास कायम राहिला असून मोहिमेचा परिणाम आणि ग्राहकांचा आत्मविश्वास यांच्यामुळे १७५ पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले आहेत.

आपला आनंद व्यक्त करताना रोहित गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रा प्रॉपर्टीज म्हणाले की, “या साथीमुळे ग्राहकांच्या मागण्या आणि साइटला भेटी मागील काही महिन्यांत कमी झाल्यामुळे मालमत्तेच्या विक्रीवर मोठा ताण आला आहे. अशा प्रकारचा कालावधी अभूतपूर्व असल्यामुळे मंत्रा प्रॉपर्टीजने मंत्रा घर बनाये धनी, ८ टक्‍के की आमदनी ही एक खास मोहीम आपल्या संभाव्य ग्राहकांसाठी आणली. त्यात रिअल इस्टेटच्या इतिहासात प्रथमच घराला दोन वर्षांसाठी फक्त ८ टक्क्यांचा व्याजदर मिळणार आहे. प्रामुख्याने या वेळचे उद्दिष्ट आमच्या ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पुरेपूर मूल्य देण्याचे म्हणजे त्यांच्या स्वप्नातील घर आणि त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतील अशा आठवणी निर्माण करण्याचे आहे. दुसरे म्हणजे आम्ही एक ऑफर देऊन हे स्वप्न अधिक खास करत आहोत. ते ज्या घरात गुंतवणूक करतील ते त्यांच्या कुटुंबाचा भाग होईल आणि खूप गोष्टींची काळजी घेतली जाईल अशा प्रकारचे जास्तीचे उत्पन्न त्यांना मिळू शकेल. त्यांना इतर कोणत्याही गुंतवणुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसतानाच्या या कालावधीत त्यांना हे फायदेशीर ठरेल.”

ही योजना दोन वर्षांच्या कालावधीसाठी रिकरिंग डिपॉझिटच्या स्वरूपात काम करते. त्यात ग्राहक आपल्या घरासाठी जी काही रक्कम प्रदान करतील त्यांना त्या कालावधीसाठी ८ टक्‍के व्याजदर मिळेल आणि तो व्याजदर पहिल्या वर्षाच्या शेवटी त्यांना दिला जाईल. त्याचप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांत केल्या जाणाऱ्या प्रदानावर आधारित राहून ८ टक्‍के रक्‍कम त्या काळासाठी मोजली जाईल आणि कालावधीच्या शेवटी त्यांना दिली जाईल.

नितीन गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष- विक्री, मार्केटिंग आणि सीआरएम, मंत्रा प्रॉपर्टीज म्हणाले की, ”आमच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीसाठी योग्य तो फायदा देण्याची हीच वेळ आहे, असे आम्हाला वाटत होते. आम्हाला या मोहिमेसाठी संभाव्य घर ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि या मोहिमेने पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात विक्रम घडवून आणला आहे. आम्हाला ६७० पेक्षा अधिक सदस्यांना कायमस्वरूपी विस्तारणाऱ्या मंत्रा कुटुंबात स्वागत करताना खूप अभिमान वाटतो. या सणांच्या कालावधीचे हे एक उत्तम स्वागत आहे.”

मागील तीन महिने हे कंपनीच्या सर्वोच्च कामगिरीचे निदर्शक असताना पुढील दोन महिन्यांसाठी मंत्रा प्रॉपर्टीज सणांचा कालावधी आणि घर खरेदीची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रगती करणार आहे. ते आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित डील्स देणार आहेत, ज्यांचा फायदा रिअल इस्टेट गुंतवणूक करणाऱ्यांना होऊ शकेल.

मंत्रा प्रॉपर्टीज बद्दल:

मंत्रा प्रॉपर्टीज ही पुण्यातील सर्वांत तरूण आणि वेगाने वाढणारी रिअल इस्टेट कंपनी असून ती पुण्यात प्रगतीपथावर आहे. २००७ मध्ये स्थापना झाल्यापासून आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा काळजीपूर्वक ऐकून त्यांना सर्वोत्तम मूल्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे इंटेलिजेंट डिझाइन आणि दर्जा, पारदर्शकता आणि डिलिव्हरी यांच्यावर असलेला भर यांच्यामुळे आम्हाला ग्राहक तसेच बाजाराचा विश्वास मिळवणे शक्य झाले आहे. हा विश्वास मागील १३ वर्षांच्या कालावधीत ११ पूर्ण केलेले प्रकल्प, पुणे आणि पीसीएमसीमध्ये विकसनांतर्गत असलेले १५ प्रकल्प यांच्याद्वारे निर्माण झाला आहे आणि आमच्याकडे सध्या ६६ लाख चौरस फूट जमीन बांधकामाअंतर्गत आहे.

Leave a Reply

Translate>>